एक शिक्षकी शाळेचा निर्णय मागे घ्या : एसएफआय आक्रमक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने केली मागणी;निर्णय रद्द नाही केला तर जिप वर करणार तीव्र आंदोलन


बीड : प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला होता तसा जी.आर. देखील प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला होता मात्र या निर्णया पाठीमागचे गांभीर्य व सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता वेळीच एसएफआय ने बीड जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन करून हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. यानंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि प्रशासनाने विद्यार्थी हीता विरोधी असणारा निर्णय घेतला आहे. दि. २१/०६/२३ रोजी प्रशासनाने जिल्ह्यातील १ ते १० व ११ ते २० पटसंख्या असलेल्या शाळेवरील प्राथमिक शिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाने १ ते १० व ११ ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर शिकवण्यासाठी व मुख्याध्यापक पद सांभाळण्यासाठी एकच शिक्षक उरतो. या होणाऱ्या समायोजनाने सदरील २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा घेतलेला एक शिक्षकी शाळेचा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा एसएफआयच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थी व पालकांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसएफआयच्या वतीने प्रशासनास देण्यात आला.

यावेळी एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, बीड जिल्हा सचिव संतोष जाधव, डीवायएफआय युवक संघटनेचे बीड तालुकाध्यक्ष सुहास जायभाये, एसएफआयचे जिल्हा उपाध्यक्ष शिवा चव्हाण, जिल्हा सचिव मंडळ सदस्य युवराज चव्हाण, जिल्हा कमिटी सदस्य समीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *