पुणे – पुण्यात सध्या प्रत्येक दिवसाला आगीच्या घटना समोर येत आहे. अशातच पुण्यातील धायरी येथे अभिनव कॉलेज परिसरातील पार्टी पॉप्स बनवण्याऱ्या एका कारखान्याला आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोचले असून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या ठिकाणी कागद पुठ्ठा अशा अनेक गोष्टी असल्याने आग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील तसेच पी एम आर डी ए च्या फायर ब्रिगेडच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .