लांजा नगराध्यक्ष च्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी स्वतः १५ ऑगस्ट ला उपोषणाला बसणार..


लांजा :लांजा नगराध्यक्ष आणि त्यांच्या सत्ताधारी सहकारी नगरसेवकांनी लांजा शहरातील विविध विकास कामांचा शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या माध्यमातून आलेला  ९ कोटी १५ लाख रु चा विकास निधी केवळ राजकीय अनास्थेपोटी आणि सूडबुद्धिने थांबवून ठेऊन विकास कामांना खीळ घालण्याचा केवीळवाणा प्रयत्न केला आहे.

सदरची विकास कामांचा निधी राज्य शासनाकसून लांजा नगरपंचायत च्या खात्यामध्ये जमा झालेला असताना ही या विकास कामांबाबत लागणारा ना हरकत दाखला देण्यास विरोध करत त्यांनी गावातील लोकांचा रोष ओढवून घेतला आहे, या पार्श्वभूमीवर दिनांक १५ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्य दिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे वतीने लाक्षणिक उपोषण तहसिल कार्यालय लांजा येथे करण्यात येणार असून त्यावेळी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी स्वतः उपोषणाला बसणार असून या उपोषणाला महाविकास आघाडी तसेच लांजा शहरातील गावकर, मानकर, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला व व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *