बॉलिवूड ची देसीगर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आपल्या फॅशन किंवा ट्विट वरून चर्चेचा विषय ठरते.
नुकताच प्रियांकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून तिने नव्या रेस्टॉरंटची माहिती चाहत्यांना दिली आहे. तिच्या या नव्या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ असे ठेवण्यात आले आहे.
यातच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, न्यूयॉर्कमध्ये सुरू होणाऱ्या या नवीन रेस्टॉरंटमध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळणार आहे. त्यामुळे “मी खूप आनंदी आहे.’ असे तिने सांगितले आहे. प्रियंकाच्या या नवीन रेस्टॉरंटसाठी तिच्या जगभरातील चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.