मुंबई – राज्याच्या शिक्षण विभागाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीनेच द्याव्या लागणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचा आणि संभ्रमाचे वातावरण होतं. मात्र यामध्ये शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यात आलेला नाही.
दुसरीकडे पहिली ते आठवी या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सरसकट परिक्षेविना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याच धर्तीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेविना पास करण्यात येणार आहे. मग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आता पालक वर्ग विचारू लागले आहेत.