प्रतिनिधी – प्रियंका सोहनी
महाराष्ट्र विधानसभेमधून ६ व ७ मार्चला २,७४६ कर्मचारी नेत्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये ३६ जण करोनाबाधित सापडले आहेत. यामुळे आजच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आल होतं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातच आता मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली होती.
यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेतील ३६ कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर करोनाचे सावट आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण आढळू लागल्याने लॉकडाऊन पडणार की निर्बंध वाढणार याबाबत उलटसुटल चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे राज्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत.