बँक ऑफ बरोडा स्थापना दिनानिमित्त पोलिसांना रेनकोट वाटप
रवींद्र मालुसरे
मुंबई : (रवींद्र मालुसरे ) – नागरिकांच्या जिवीतासह वित्तमालमत्तेची सुरक्षा यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी अहोरात्र पाऊस, ऊन,वारा,वादळ, करोना सारखी महामारी असो किंवा आतंकवादी हल्ला असो या याकाळात खाकी गणवेशात पोलीस अधिकारी कार्यरत असतात. त्यांच्या या सेवाभावाचे ऋण भारतीय नागरिकांनी कायमचे लक्षात ठेवावे असे उदगार बँकेचे रिजनल हेड तेज प्रकाश तुलसियन यांनी काढले. बँक ऑफ बरोडाच्या ११६ व्या स्थापना दिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी येथील ब्रँचच्या वतीने दादर-प्रभादेवी येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सध्याच्या पावसाळी दिवसात उपयोगात येतील असे उत्तम प्रतीचे रेनकोटचे वाटप करण्यात आले.
ते पुढे असेलही म्हणाले की,देशात इंग्रजांची राजवट असताना बडोदा संस्थानचे संस्थापक छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षण, नागरी सुविधा, वाचन संस्कृती वाढावी, क्रीडा, बँकींग अशा अनेक क्षेत्रांसाठी मौल्यवान कामगिरी केली, बँकिंग क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर अग्रेसर असणाऱ्या बँक ऑफ बडोदाची स्थापना त्यांनी २० जुलै १९०८ रोजी केली तेव्हापासून त्यांच्या समाजाप्रती असलेल्या विचारांचे योगदान बँक प्रशासन केव्हाही विसरले नाही. या कार्यक्रमास दादर पोलीस स्टेशनचे ACP संदीप बागडीकर, PI साटम साहेब, भारमल साहेब, ब्रँच मॅनेजर किशोर कुमार झा, बँक अधिकारी गणेश अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.