आनंदी असू देत आपली दिनचर्या
के डी सर
आनंदी असू देत आपली दिनचर्या
आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द इतकी महत्वाची असली पाहिजे की सकाळी जाग ही अलार्म वाजण्याच्या अगोदर आली पाहिजे. घड्याळाच्या गजरा पेक्षा ज्यांना जबाबदारी जागं करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात.
झाडावरुन प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला ईजा होत नाही..!
पॉझिटिव्ह आहे समजल्यानंतर लांब पळून जाणारे, निगेटिव्ह झाल्यावर फुलं घेऊन येतात, ही आपल्या समाजाची रीतच आहे. म्हणून जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं, तेव्हा जिंकणे गरजेचे असते. आयुष्याची प्रत्येक लढाई जिंकूनच पूर्ण करायची असते.
के डी सर ग्रंथपाल, बलसूर-धाराशिव.