हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी (सी.आर.आय.एफ.) मधुन ५५ कोटी ४१ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख जिल्हा मार्ग राज्यमार्ग यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वडगाव- लाटवडे भेंडवडे खोची ते दुधगाव जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याची सुधारणा करणे- ४ कोटी ८७ लाख, पन्हाळा तालुक्यातील निगवे कुशिरे पोहाळे गिरोली कोडोली रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे- २ कोटी ४३ लाख, राक्षी धबधबेवाडी निकमवाडी इंजोळे बांदिवडे घुंगूर रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे- २ कोटी ४३ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.
तसेच शिरोळ तालुक्यातील जे जे मगदूम इंजिनीअरिंग कॉलेज पासून नांदणी नाका ते चौंडेश्वरी कडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे- ३ कोटी ९६ लाख तसेच सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील शिरगाव-वाळवा या कृष्णा नदीवरील पुलासाठी ३३कोटी ८७लाख रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शिराळा कापरी कार्वे लाडेगाव येडेनिपाणी गोटखिंडी बावची आष्टा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे- ३ कोटी ८९ लाख, आष्टा दुधगाव सावळवाडी कुंभोज रस्त्याची रूंदीकरणासह सुधारणा करणे ३ कोटी ९६ लाख रुपये मणजूर करण्यात आले आहे.
संपूर्ण ५५ कोटी ४१ लाख रूपयांची तरतूद केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी (सी.आर.आय.एफ.) मधुन करण्यात आलेली आहे. अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. मतदारसंघातील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या व पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करणे कमी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अर्थमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे खासदार माने यांनी सांगितले.