मोरपीस हे खुपच शुभ मानले जाते. आपण अनेकांच्या घरात किंवा दरवाज्यात समोर मोराचेपीस लावलेले पाहत असतो. मात्र त्याचे चमत्कारी फायदे आज आपण बघणार आहोत. मोरपीस दिसायला जेवढे सुंदर आहेत, तेवढे त्याचे फायदे देखील आहे. मोरपीस हे आपल्याला काही संकटातून वाचवू शकतात. घरगुती भांडण दूर करण्यासाठी तसेच धनप्राप्तीसाठी मोरपिसाचा वापर होतो.
फायदे
१. घरात नकारात्मक ऊर्जा किंवा कीटक प्राणी येऊ नये यासाठी घराच्या मुख्य दाराजवळ मोरपीस लावावे.
२. एखाद्या देऊळात जाऊन मोरपीस कृष्णाच्या मुकुटात लावावा आणि ४० दिवसानंतर तो आणून आपल्या तिजोरीत ठेवावा याने आर्थिक लाभ होतो.
३.मोरपीस चांदीच्या ताविजमध्ये घालून जन्मलेल्या बाळाच्या मनगटाला बांधा, वाईट नजरेपासून संरक्षण होईल.
४. आपला मुलगा हट्टी असल्यास किंवा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपीस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो.
५. मोरपिसावर मारुतीच्या कपाळावरचे शेंदूर, दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांचे नाव घेऊन लावावे आणि सकाळी तोंड न धुता त्याला वाहत्या नदी मध्ये सोडून द्यावे ज्यामुळे आपल्याला विरोधकांकडून होणारा त्रास कमी होईल.
६.आग्नेय दिशेला जर मोरपीस लावल्याने घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. तसेच ईशान्य दिशेला श्रीकृष्णाच्या फोटो सोबत मोरपीस लावावा. फायदा होतो.
७. आपल्यावर जर ग्रहांचा अशुभ परिणाम झाला असेल तर मोरपिसावर २१ वेळा ग्रहाचे मंत्र उच्चारून पाणी शिंपडावे आणि आपल्याला दिसेल अशा जागी ठेवावे.