नवी दिल्ली। आइसलँडच्या एका ज्वालामुखीत ८०० वर्षांपूर्वीपासूनच्या मृत ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे. आइसलँडची राजधानी रेक्याविकपासून जवळपास ३२ किलोमीटर दूर असणाऱ्या या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, आता या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर येत आहे. हवामान विभागाने सांगितलं की, आइसलँडची राजधानी रेक्याविकमध्ये असलेल्या रेक्येनीस पेनिनसुलामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.
ज्वालामुखीजवळून जाणारा रस्ताही त्यापासून २.५ किलोमीटर आहे. तिथूनही ज्वालामुखीचा धगधगता लाव्हा अगदी स्पष्टपणे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इथे भूकंप झाला होता त्यामुळे ज्वालामुखी होण्याचे संकेत दिले गेले होते. तेथील आजूबाजुतील नागरिकांना बाहेर ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यांना आपल्या घरच्या खिडक्या बंद ठेवण्यास सांगितले आहे.