सध्या संपूर्ण जगभरावर कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसुन येत आहे. आज या कोरोनाच्या संसर्गाने अनेकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. तर अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. मात्र या संकटातही अनेक वयस्कर व्यक्तींनी स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने कोरोनावर मात केली आहे. अशीच काहीशी घटना गोरखपूर येथे घडलेली आहे.
गोरखपूरमधील अलीनगर येथील ८२ वर्षीय विद्यादेवी या वयोवृद्ध महिलेने ऑक्सिजन पातळी कमालीची घसरून सुध्दा हार मानली नाही. आपल्या मुलाच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि पाठबळावर या आजीबाईंनी १२ दिवसांत कोरोना संसर्ग विरोधातील युद्ध जिंकले आहे. आजींची ऑक्सिजन पातळी ४ दिवसांत ७९ वरुन ९४ पर्यंत वाढली. या पूर्ण संकटात त्यांचा मुलगा हरी पाठीशी ठामपणे उभा राहिला होता.
विद्यादेवी यांचा मुलगा हरि मोहन यांनी आईसोबत चार दिवस तिच्या खोलीत राहिले. २४ तास ७ दिवस ते आईच्या ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी केलेली देखरेख आणि आईविषयीचं त्यांचे प्रेम,समर्पण यामुळे विद्यादेवी कोरोनामुक्त झाल्या आणि घरी परतल्या. या संदर्भात त्यांची सेवा करणारा मोठा मुलगा म्हणाला म्हणाला की, आईला कॉर्नचा संसर्ग झाला होता.
मात्र लागण झाल्यावर आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु केले. संसर्ग झाल्यानंतर आईची ऑक्सिजन पातळी एक दिवस ७९ वर पोहोचली. यामुळे आम्ही कुटुंबीय घाबरलो. असं असूनही आम्ही हार मानली नाही. आम्ही आईला पंलगावर पालथे झोपायला सांगितले. या पद्धतीने श्वासोच्छवास करण्याच्या पद्धतीला प्रोनिंग म्हणतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं पातळी वाढतं जात हळूहळू तिची परिस्थिती सुधारली.