पुणे : राज्यात अनेक सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय पुढाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच अनेक आजी-माजी नगरसेवकांना आणि आमदारांना कोरोनामुळे आपल्या प्रणाला मुकावे लागले आहे. त्यातच बाजीराव पेशवा यांचे ९ वे वंशज महेंद्र पेशव्यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
श्रीमंत महेंद्र पेशवा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची तब्येत खालावली. त्यात कोरोनाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि मंगळवारी त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्र राज्यातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्रित आणणारी संघटना असलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. श्रीमंत महेंद्र पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे ९ वे वंशज होते. पुण्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्यातच श्रीमंत महेंद्र पेशवे यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचे निधन झाले.