गुजरात- गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून अहमदाबादमधील कोविड रुग्णालयाने उपचारास नकार दिला व एका महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
इंद्राणी बॅनर्जी अस या महिला प्राध्यापकाचं नाव असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं.मात्र रुग्णालयाने EMRI १०८ रुग्णवाहिकेतून आणलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. काही काळानंतर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली मात्र वेळेत उपचार मिळाले नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला.