पुणे – आग लागण्याच्या घटनांमध्ये दिसेंदिवस वाढ होत आहे. अशातच कुमठेकर रस्त्यावरील राज्य शिक्षण संशोधन परिषदेच्या कार्यालयातील आवारात ठेवलेल्या टाकाऊ फर्निचरला मंगळवारी दुपारी आग लागली. आगीत टाकाऊ फर्निचर जळाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
कुमठेकर रस्त्यावर राज्य शिक्षण संशोधन परिषदेच्या तीन मजली इमारतीच्या आवारात तळमजल्यावर लाकडी फर्निचर, जुनी कपाटे ठेवण्यात आली आहेत. अग्निशमन दलाच्या कसबा पेठ आणि एरंडवणे केंद्रातील दोन बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल राजेंद्र पायगुडे, ढमाले, सुरेश पवार, अरगडे यांनी पाण्याचा मारा करून 10 मिनिटात आग आटोक्यात आणली. तळमजल्यावर स्वच्छतागृहाशेजारी मोठ्या प्रमाणावर टाकाऊ फर्निचर, लोखंडी कपाटे ठेवण्यात आली होती. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याची शक्यता अग्निशमक दलाने व्यक्त केली आहे.