सध्या देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. आज अनेकांना कोरोनाची लागण होऊन आपला प्राण गमवावा लागत आहे. आज भारतात वैद्यकीय व्यवस्था सुद्धा अपुरी पडू लागली आहे. आज आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा भारतात पसरलेल्या कोरोनाच्या उद्रेकाचा आपल्या वृत्तामध्ये उल्लेख केला आहे. त्यात अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘टाइम’ या वृत्त पत्राने आपल्या मुखपृष्ठावर भारतातील करोना संकटाचे भयावह परिस्थितीचे भाष्य करणारे छायाचित्र प्रकाशित केले आहे.
‘भारत संकटात’ या हेडलाइनखाली स्मशान भूमीतील छायाचित्र टाइमने प्रकाशित केले. या फोटोतून देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल बोलकं चित्र संपूर्ण जगभरासमोर आलं आहे. भारतातील करोना परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भाष्य केले आहे. भारतात करोनाचे संकट अधिक गंभीर होणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आपल्या वृत्तांकनात दिला आहे. आज भारतात वाढत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे बदलेला चेहरा जगासमोर उघड पडला आहे.
‘टाइम’साठी नैना बजेकल यांनी कव्हर स्टोरीत म्हटले की, भारतातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या परिस्थितीत आहे. देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रुग्णांसाठीच्या खाटांची कमतरता आहे. भारतीय रेमडेसिवीरच्या शोधासाठी धावपळ करत आहेत. मागणी अधिक असल्यामुळे औषधे चढ्या दराने खरेदी करावे लागत आहेत. तर, वाढत्या करोना चाचणींमुळे प्रयोगशाळांवर ताण वाढला आहे. हे करोना संकट फक्त भारतातील १.४ अब्ज नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी भयावह असणार असल्याचे ‘टाइम’ने म्हटले आहे.