मुंबई । राज्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कालच भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होती त्यानंतर आज राज्यात तब्बल चार आगीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात मुंबई, पुण्यासह आगीच्या मोठ्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज मुंबईतल्या प्रभादेवी भागात इमारतीला आग लागली आहे.
प्रभादेवीतील इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनच्या तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. एडीओ पवार आणि शिर्केसहीत १२ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठी आहे. तळमजल्यावर ही आग लागली आहे. आगीचा भडका होऊन वरच्या मजल्यावर आग पसरु नये म्हणून प्रयत्न सुरू आहे.