एकाकीकडे संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक होत आहे तर दुसरीकडे हरिद्वारच्या कुंभमेळ्याला तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. कुंभमेळ्यामध्ये १००० साधू पॉसिटीव्ही मिळाल्याने अनेक लोकांनी याबाबत ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आल्याचे पाहायला मिळाले. त्याचसंदर्भात हिंदी अभिनेता करण वाहीला त्याच ट्विट महागात पडलं आहे. करण वाहीने कुंभमेळ्यात नागा साधुंच्या गर्दीवर पोस्ट केलं होत.
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊन तो ट्रोल्सच्या तावडीत मिळाला आहे. त्याचबरोबर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
“नागा बाबांसाठी वर्क फ्रॉम होम कल्चर नाही आहे का? म्हणजे गंगेचं पाणी घरी आणा आणि आंघोळ करा.” असा शब्दात करणने ट्विट केलं होत,त्यामुळे हि पोस्ट अनेकांना आवडली नाही. त्याने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. यात त्याला खूप घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केल्याचं समोर येत आहे. त्याला काहींनी शिवीगाळी दिली आहे. ‘हिंदू भावना दुखावल्याचा’ आरोप अनेकांनी त्याच्यावर केला आहे. त्याचसोबत पोस्ट डिलीट कर नाही तर नाही तर तुझ्यावर बहिष्कार घालू अशा कमेंट करणला आल्या आहेत.