प्रतिनिधी- दुर्वा मुरुडकर
राज्यात करोनाचा कहर वाढत असताना बॉलिवूडमध्ये देखील करोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, आमिर खान, मनोज वाजपेयी, आर. माधवन यांच्यानंतर आता आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण यालाही कोरोनाचे गाठले आहे. मिलिंदने ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘टेस्ट पॉझिटीव्ह आली, क्वारंटाइन,’ असे ट्विट त्याने केले आहे. सध्या मिलिंद त्याच्या घरीच क्वारंटाइन आहे. दरम्यान मिलिंद सोमणच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्याची कामना केली आहे.
Tested positive. #Quarantine
— Milind Usha Soman (@milindrunning) March 25, 2021
मिलिंद सोमण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. पत्नीसोबतचे अनेक व्हिडीओ व फोटो शेअर करण्यासोबत तो स्वत:चे फिटनेस व्हिडीओही शेअर करत असतो. त्याच्यासारख्या फिटनेसप्रेमी अभिनेत्याला करोनाची लागण झाल्याने चाहते चिंतीत आहेत. मिलिंदला करोना झाल्याने चाहते चिंतीत असताना मिलिंदची पत्नी अंकिताची पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. मिलिंदसोबतचा फोटो शेअर करत, ‘इतर कशाचीही पर्वा नाही…,’ असे तिने लिहिले आहे. या पोस्टमध्ये तिने लव्ह आणि … असे दोन हॅशटॅग वापरले आहेत. माझे प्रेम आणि माझी शक्ती तुझ्यासोबत आहेत, असे कदाचित अंकिताला मिलिंदला सांगायचे असावे.