कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस दिवस वाढत चालला आहे. प्रत्येक दिवसाला हजारोंच्या पट्टीने कोरोनाचे रुग्ण मिळत आहे. अशातच संपूर्ण देशाला कोरोनाने विळखा घातला आहे व या विळख्यात संपूर्ण जग भरडले गेले असून दिवसेंदिवस चिंतेत भर पडत आहे. अनेक दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री ,अभिनेते हे कोरोना पॉझिटिव्ह आले असता अजून एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.
कमी वयात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सगळ्याचे मनावर राज्य करणारी अभिनेत्री आलिया भटला कोरोनाची लागण झाली आहे. ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. सर्व काळजी घेत तिने स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. व तिने सर्वांना काळजी घेण्यास सांगितले आहे.