बॉलिवूडमध्ये अनेक कपल कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असतात. सर्वच अभिनेते व अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया अकॉऊंटवरून चाहत्यांना वेगवेगळं सरप्राईज देत असतात असच एका कपलनी आपल्या बोटातील अंगठीचा फोटो गुडीपाडव्यादिवशी शेअर करत आपल्या चाहत्यांना सरप्राईझ केलं आहे. व कॅप्शन असा दिलाय कि चाहत्यांचाही गोंधळ उडालाय.
सध्या बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असणारं कपल म्हणजे अभिनेत्री मलायका आरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. ते दोघे सतत डिनर डेटला जाताना, एकत्र फिरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर मलायकाने शेअर केलेल्या फोटोमुळे त्यांचा साखरपूड झाला अशा चर्चा रंगल्या आहेत. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हा फोटो शेअर करत तिने ‘अंगठी एखाद्या स्वप्नासारखी आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊ इच्छिता तर अंगठी हा उत्तम पर्याय आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिने दिलेले कॅप्शनपाहून मलायका आणि अर्जुनचा साखरपूडा झाला नसून ती एखाद्या ब्रँडचे प्रोमोशन करत असल्याचे दिसत आहे.