मुंबई – सध्या संपुर्ण देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशभरातील रुग्णालयांत हजारो लोक दररोज मृत्यूशी दोन हात करताना दिसत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत देशवासीयांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
“आपण सर्वच जण या कोरोनाविरोधात दमदार लढा देतोय.आणि यात आपण जिंकलोय. हे यश वास्तविकतेकडे ही वळवणं शक्य आहे. यासाठी आपल्या सर्वांना खूप शक्ती मिळो.! शिवाय ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, ते लवकरात लवकर यातून बाहेर पडू दे ” अशा आशयाचा संदेश तिनं दिलं आहे. तिच्या व्हिडीओवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रिया सध्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत रायबागण ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही मालिका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित आहे. या मालिकेतील एक फाईट सीन प्रियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. प्रिया आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. प्रियाचा हा व्हिडीओ चाहत्यांना भरभरून आवडला आहे.