मध्यप्रदेश : सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशील्ड’ या लसीची किंमत ठरल्यानंतर एव्हरेऊन आता मोठा वाढ निर्माण झाला होता. खुद्द काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून वेगवेगळ्या किमतीवरून केंद्रावर ताशोरे ओढले होते. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे आमदार राधामोहनदार अग्रवाल यांनी लसीच्या किमतीवरून अदर पुनावाला यांना डाकू म्हणून संबोधले आहे. त्यात केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने टीका केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोरखपूरचे भाजप आमदार राधामोहनदार अग्रवाल यांनी लसीची सिरमकडून ठरून देण्यात आलेल्या किमतीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अदर पुनावाला हे डाकू असून केंद्र सरकारने साथीचे रोग कायद्या अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्यावी’, अशी खळबळजनक मागणी या भाजप आमदाराने केली आहे. मात्र या विधानावर अद्याप भाजपाच्या बड्या नेतात्यांनी बोलणे टाळले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीची नवी किंमत ठरवल्यानंतर भाजप आमदार राधामोहनदार अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी अग्रवाल असे म्हणाले की, ‘अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे.’ अग्रवाल यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने आपली कोव्हीशिल्ड ही लस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस केल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, कोव्हीशिल्ड ही लस जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा स्वस्त असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.