मुंबई : पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कुरणांची लागण झल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली होती. मात्र आता आदित्य ठाकरेंनीं कोरोनावर मात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. यानंतर आदित्य ठाकरे पुन्हा कामालाही लागले आहेत. तसेच ते प्रसारमाध्यमांशीही संवाद साधण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येत आहे.
आदित्य ठाकरे यांना २० मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्यावर उपचार सुरु होते. तर आदित्य ठाकरे यांची आई रश्मी ठाकरे यांनाही कोरोना झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आता त्यांचा प्रकृतीही स्थिर आहे.