मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच आज रात्रीपासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांवर कोणताही परिणाम होणार नाही अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा काल फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी केल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संदर्भात मुंबईकरांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत आणि त्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे “संचारबंदी लागू झाल्याने आमच्या घरी कामवाल्या बाई येणार का?” मात्र यावर आयुक्तांनी हो म्हणून उत्तर दिले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच उद्या या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येतील असे सुद्धा त्यांनी म्हणून दाखविले आहे. राज्य सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेत असताना आर्थिक दुर्बल घटकांना देखील त्रास होणार नाही यासाठी चांगले आर्थिक सहाय्य देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.