देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राजधानी दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी रात्री १० वाजल्यापासून पुढील ६ दिवसांच लॉकडाऊन लावण्यात आलं मात्र लॉकडाऊनची घोषणा करताच अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली. आनंदविहार पोलीस ठाण्यात परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची मोठी गर्दी झाली. भीती आणि शंका लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मजुरांना दिल्लीत राहण्याचे आवाहन केले होते. तरीही त्यांच्या आवाहनाचा परिणाम झालेला दिसला नाही. अनेक मजुरांना लवकरात लवकर गावी जाण्याची घाई दिसून येत होती.
Delhi: Migrant workers continue to leave for their hometown as the 6-day lockdown in the national capital comes into effect. Visuals from Anand Vihar Bus Terminal.
The lockdown, which started at 10 pm last night, will remain imposed till 5 am on April 26th. pic.twitter.com/8mJfiif2ey
— ANI (@ANI) April 20, 2021
हे सगळं पाहता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोणीही दिल्ली सोडून जाऊ नये, हे छोटा लॉकडाऊन आहे. लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी हे करावं लागत आहे, केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. सरकार पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. असा आवाहन मजुरांना करण्यात आले आहे.