महाराष्ट्रातदेखील असे अनेक ठिकाण आहेत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही गुप्त किंवा त्याबद्दल अनेकांना माहित नसते. अलिबाग डोळ्यासमोर आलं की अलिबागमधील रेवदंडा किल्ला आणि समुद्र किनारा हा नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो परंतु याच प्रसिद्ध पर्यटन क्षेत्राभोवती असे काही छोटे मोठे अधिवास आहेत जे निसर्ग निरीक्षण व खास म्हणजे पक्षी निरीक्षण करणाऱ्या पक्षी मित्रांपासून अजूनही आडोसा घेऊन आहेत.
१९७१ मध्ये पार पडलेल्या ‘रामसार अधिवेशनात’ याची रीतसर व्याख्या निर्मित झाली. दलदल, कुजून रुपांतर झालेले वनस्पतीजन्य-जमीन किंवा पाण्याचे क्षेत्र, नैसर्गिक किंवा कृत्रिम, स्थायी किंवा तात्पुरते, साचलेल्या पाण्यासह जेथे कधी ताजे पाणी येते ती जमीन मग ते पाणी गोड असो वा खाडी वा समुद्राचे खारे पाणी व त्याच बरोबर सागरी पाण्याच्या क्षेत्रासह जेथे ओहोटीच्या वेळी पाण्याची खोली सहा मीटरपेक्षा कमी असते अशा सगळ्या जागा या पाणथळ अधिवास म्हणून गृहीत धरल्या जातात. जगविख्यात संकेतस्थळावर नोंदवलेल्या सूचनेनुसार जगभरातील उपलब्ध एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ७ टक्के इतके क्षेत्र हे ‘पाणथळ अधिवास’ क्षेत्रांमध्ये मोडते. या ७ टक्के क्षेत्रातून समस्त मानवी समाजाला लाभदायक ठरेल असे ४५% नैसर्गिक संसाधने मिळतात. याच बरोबर २०,००० हजार दशलक्ष वर्ष पुरेल इतकी विविध पद्धतीच्या सोई-सुविधा याचं पुरवठा हे पाणथळ क्षेत्र करतात.
भारत सरकारद्वारा २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र राज्य पाणथळ क्षेत्र अहवालानुसार देशभरात असलेल्या पाणथळ क्षेत्रामधील सुमारे ४६,८४४ हेक्टर क्षेत्र हे फक्त रायगड जिल्ह्यामध्ये मोडते. पाणथळ जागेचे प्रकार अनुरूप एकूण १,७६० पाणथळ अधिवास रायगड जिल्हात अंतर्भूत होतात.
रेवदंडा एसटी डेपोपासून उजव्या बाजूने जर आपण वळालो तर एक बायपास रस्ता जातो जो पुढे जाऊन अलिबाग या १९ किमी दूर असलेल्या जवळच्या शहराला मिळतो. याच रेवदंडा-अलिबाग रस्त्यावर आपण चालत निघालो की साधारण २० मिनिटांवर पाणथळ अधिवासा आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या या पाणथळ क्षेत्राला नियमितपणे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या कुंडलिका नदीच्या व्याप्तीत मोडणाऱ्या कांदळ वनातून गोड्या-खाऱ्या पाण्याचा पुरवठा भरतीच्या वेळेत होत असतो. एका बाजूला उभी असलेली आगरकोट (रेवदंडा) किल्ल्याची भिंत या अधिवासचे रक्षण करते. दुसऱ्या बाजूला वाहत असणारी कुंडलिका नदी याला समृद्ध करत असते. ६,०३१ चौ. मीटर पसरलेल्या या क्षेत्राचा परिघ जवळपास ३१० मीटर इतका भरतो. कधी शास्त्रीय पद्धतीने, पक्षी निरीक्षण करण्यासाठी योग्य जागा आहे, व पक्षी प्रेमींना हा जागा अभ्यासपूर्वक आहे.
कांदळ वनातून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे विहंग मंडळी ना नानाविधी खाद्याची मेजवानी मिळते. मासे, कोळंबी, मृदुकाया कवच धारी सागरी प्राणी, किडे, पाण्यात उगवणारी लुसलुशीत गवत आणि त्याचे कोंब व फळे, गवत आणि शेजारी वाढलेल्या वनस्पतीवर विचरण करणारे कीटक, साप आणि बेडूक असे विविध-अंगी पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपल्या शरीर व त्यातही चोच रचनेनुसार विविध पक्षी येथे आपला मुक्काम ठोकून असतात. या कालावधीत नोंद केलेल्या एकूण पक्षी प्रजातीची संख्या ३४ पेक्षा अधिक भरेल तर एकूण किती पक्षी मी येथे नोंदवले याची बेरीज केली तर ती साधारण २००० पेक्षा अधिक आहे. काही पक्षी जे येथे सतत दिसतात ते म्हणजे खालील प्रमाणे.
छोटा पाणकावळा (Little Cormorant), भारतीय पाण कावळा (Indian Cormorant), गाय बगळा(Cattle Egret), मोठा बगळा (Great Egret), छोटा बगळा (Little Egret), राखी बगळा (Grey Heron), जांभळा बगळा(Purple Heron), रातढोकरी (Black-crowned Night Heron), ढोकरी (Indian Pond Heron), घार (Black Kite), पांढऱ्या छातीची पाणकोंबडी (White-breasted Waterhen), टिटवी (Red-wattled Lapwing), कोकिळ (Asian Koel), करकोंबा (Greater Coucal), सामान्य धिवर (Common Kingfisher), पंढऱ्या छातीचा धीवर (White-throated Kingfisher), वेडा राघू (Green Bee-eater) आणि काळी शराटी.
आणखी काही अशा देखील प्रजाती आहेत ज्या खूप मोठा प्रवास करून या क्षेत्रात येत आहेत. कुंडलिका नदी आणि तिच्या आजूबाजूला असणाऱ्या कांदळ वनात अशा काही खाजणी जागा आहेत जेथे या पक्षाचा सतत भरणा असतो. आम्ही लेखनातून जमलं तसं वर्णन केले आहे, तुम्ही या ठिकाणी नक्की भेट दया.