बारामतीमध्ये भंगार गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक लागलेल्या या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असण्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणत्याही जीवित हानी झालेली नाही.
दरम्यान बारामती नगर परिषदेच्या हद्दीत असलेले भंगार गोडाऊन अनधिकृत असून याकडे नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
घटनास्थळी वेळीच अग्निशमन दलाला पाचारण केल्याने आग आटोक्यात येण्यास यश मिळाले आहे.परंतु या आगीचे नेमके कारण काय? आणि लागलेल्या भीषण आगीस कोणाला जाब विचारावा? असा स्थानिकांमध्ये संभ्रम आहे.