दिल्ली:- दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो (६E-२१३१) विमानाच्या इंजिनला उड्डाणादरम्यान आग लागल्याने या विमानाचे उड्डाण तातडीने रद्द करण्यात आले. विमान पायलटने वेळीच प्रसंगावधानता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या विमानातून जवळपास १७७ प्रवासी प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
#BREAKING #IndiGo flight 6E-2131 (Delhi to Bangalore) grounded at Delhi airport after a suspected spark in the aircraft | Watch @Atul_Bhatia80 pic.twitter.com/IwwRfdACQq
— shashwat bhandari (@ShashBhandari) October 28, 2022
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उड्डाणादरम्यान विमानाच्या इंजिनमधून ठिणग्या बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहे.या घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेनंतर इंडिगो कंपनीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ‘दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या ६E-२१३१ या विमानाला उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. वैमानिकाने हे उड्डाण तात्काळ रद्द केले. या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. या प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबदद्ल आम्ही दिलगीर आहोत’, असं इंडिगोनं म्हटलं आहे.
हे ही वाचा-
अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चांवर स्वत: अशोक चव्हाणांनी केलं महत्वाचं विधान, म्हणाले…
फक्त गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून तिघांनी मिळून एकाला केली जबर मारहाण; नवी मुंबईमधला धक्कादायक प्रकार