मुंबई : दोनच दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. या संदर्भात अक्षय कुमारने ट्विट करून माहिती दिली होती. आता त्यांच्या पाठोपाठ ‘राम सेतू’च्या सेटवरही ४५ लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार या चित्रपटासाठी काम करत असलेल्या ४५ ज्यूनिअर आर्टिस्टच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील मढ आयलँड या ठिकाणी काही दिवसांपूर्वी १०० जणांची टीम शूटिंगच्या कामासाठी पोहचली होती.
मात्र त्यापूर्वीच अक्षय कुमार आणि निर्माता विक्रम मल्होत्रा यांनां कोरोनाची लागण झल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर सर्वांचीच करोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात १०० पैकी ४५ ज्यूनिअर आर्टिस्टच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. अक्षय कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांच्या एका निर्णयामुळे अनेक लोक करोना होण्यापासून वाचले आहेत.
या संदर्भात जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांचे म्हणणं आहे की, चित्रपट ‘राम सेतू’ची संपूर्ण टीम सुरुवातीपासूनत सर्व प्रकारची काळजी घेत आहे. पण वास्तवाच दुर्दैवाने आमच्या ज्यूनिअर आर्टिस्ट एसोसिएशनचे ४५ लोक करोना व्हायरस पॉझिटिव्ह निघाले. या सर्वांवर सध्या उपचार सुरू असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.