मुंबई:- बॉलीवूडमध्ये चर्चेत असलेलं कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून आलियाने पोस्ट शेअर करत आपण आई होणार असल्याचे सांगितले आहे. आलियाने दिलेल्या या गुड न्यूजनंतर आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काय आहे आलियाची पोस्ट?
आज सकाळी आलियाने रूग्णालयातील तपासणी दरम्यानचा फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.यामध्ये रणबीरसुद्धा दिसून येत आहे.आलियाने ही पोस्ट शेअर करताच चाहते आणि बॉलीवूडमधील आलिया-रणबीरच्या सहकलाकारांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर हे दोघं विवाहबंधनात अडकले होते.त्यांनी आपल्या कुंटुब आणि सहकाऱ्यांच्या उपस्थिती स्वत:ला विवाहबंधनात अडकवले होते.रणबीर आणि आलियाच्या लग्नाची त्यावेळी सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगताना दिसत होती.त्यानंतर आता आलिया रणबीरने गुड न्यूज दिल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
हे ही वाचा:-