लोकसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीनितीन गडकरी यांनी “पुढील एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील आणि जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अमलबजावणी केली जाईल,” असं सांगितलं आहे.
“मी सभागृहाला आश्वस्त करु इच्छित आहे की, पुढील एक वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील. याचा अर्थ टोलवसुली जीएसच्या माध्यमातून केली जाईल. जीपीएसमधून काढण्यात येणाऱ्या फोटोंच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातील,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
नितीन गडकरी यांनी यावेळी फास्टटॅगच्या माध्यमातून टोल न भरणाऱ्या वाहनांची पोलीस चौकशी करण्याचा आदेश आपण दिला असल्याची माहिती दिली. वाहनांना फास्टटॅग नसल्यास टोल आणि जीएसटी चोरीची केस दाखल होईल असंही ते म्हणाले आहेत.