खेड- मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती कारचा आज सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात कारमधील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर ४ जण गंभीर जखमी आहे.
मुंबईहुन चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती इको कारचा मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. महामार्गाच्या कडेला असणाऱ्या रेलिंग गार्डला कारने जोराची धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.