मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होते. कोरोना संसर्ग ते माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं होत.
यावेळी पत्रकारांनी त्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख या प्रक्रणार प्रश्न विचारताच त्यांनी माध्यमांना थेट उत्तर देत म्हटले की, माझ्यासाठी अनिल देशमुख हा विषय महत्त्वाचा नाही. बॉम्ब कुणाच्या सांगण्यावरून ठेवला गेला?, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पोलिसांनी अर्थात वाझेंनी हे का केलं? किंवा कुणाच्या सांगण्यावरून केलं, याचा तपास झाला पाहिजे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, माझी आधीची पत्रकार परिषद ऐकली असेल किंवा तुम्ही त्यात असाल तर तुम्हाला माहित असेल, मी तेव्हाही बोललो होतो की यामागे कोण आहे त्याचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे आहे. राज्यातील पोलीस अधिकारे असे वागतात, त्यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मुळात अंबानींच्या घराखाली हा बॉम्ब ठेवण्यास कोणी सांगितला, याचा तपास झाला पाहिजे.
या मुद्द्यावर नजर टाकताना राज ठाकरे पत्रकार बांधवाना म्हणाले की, सध्या परिस्थिती अशी आहे की, एखादा मुद्दा चर्चिला जातो आणि काही काळानंतर चर्चा बंद झाली की याबद्दल तापास किती झाला किंवा कुठपर्यंत आला याचा विसर पडतो.