मुंबई : संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. तसेच दुसरीकडे ऑक्सिजन अभावी कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. याच पाश्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारची ऑक्सिजनची सध्याची गरज ओळखून इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची ग्वाही दिली होती.
त्यातच या कठीण संकटात रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा साथ उपलब्ध असणार आहे.
राज्याला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली.