यवतमाळ : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे राजकारण चांगलेच तापले होते. तसेच या प्रकरणी विनोद शिवकुमार यांना अटक सुद्धा करण्यात आली. मात्र या सर्व प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्व स्थरातून आता टीका होताना दिसत आहे.
काल संपूर्ण देशभरात होलिका उत्सव दहन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, होलिका उत्सवाला हिंदू धर्मात खूप पवित्र स्थान आहे. मात्र याचा कुठेतरी खासदार नवनीत राणा यांना विसर पडला आहे. असेच त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे.
काल पवित्र होळीला चपलेचा हार घालून होळी पेटवण्यात प्रकार राणा यांनी केला होता. या होळीवर चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले विनोद शिवकुमार यांचा फोटो चिटकवण्यात आला होता. आज एकीकडे भारतीय संस्कृतीत महिला होलिका पूजन करत असताना दुसरीकडे चपलेचा हार घालून तमाम हिंदूच्या भावना दुखावण्याचे काम खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.