पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या जोरदार तयारी चालू आहे. मात्र यादरम्यान अजून एका नेत्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील यांचा कोरोनाने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये प्रचारासाठी गेले होते त्यावेळी या प्रचारसभेला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील हे देखील उपस्थित होते. या प्रचारादरम्यान विरोधकांवर जोरदार हल्ला बोल करण्यात आला होता.
मात्र ९ एप्रिलला सभेपूर्वी बाबासाहेब भीमराव पाटील यांनी आरोग्य तपासणी केली व त्यांचा सभेनंतर रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री पाटील यांचा मृत्यू झाला.