अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित या वेबसिरिज मध्ये 13 वर्षाची शाळकरी मुलगी ड्रग ऍडिक्ट दाखवण्यात आली असून यातल्या काही सीन्स वर राष्ट्रीय बाल सरंक्षण हक्क कायदा समितीने आक्षेप घेतला आहे, तसेच वेबसरीज प्रदर्शित झाल्यानंतर अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या वेबसीरीजमध्ये अल्पवयीन मुलांचे चुकीच्या पद्धतीचे सीन्स दाखवण्यात आल्याने नेटफलिक्सला प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. बॉम्बे बेगम या वेबसरीज मध्ये अमृता सुभाष , पूजा भट्ट शहाना गोस्वामी या मुख्य भूमिकेत आहेत.
याआधी नेटफलिक्सच्या तांडव आणि मिर्झापुर या वेबसिरीज ही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.