मुंबई – अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या विषयांमुळे चांगलीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. व नवीन नवीन गोष्टी ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. जास्त करून ती आपला पती व भारतीय संघाचा क्रिकेटर विराट कोहलीसोबत नवीन नवीन पोस्ट शेअर करत असते व चाहतेदेखील याला चांगलाच प्रतिसाद देत असतात. असाच एक व्हिडीओ अनुष्का शर्माने आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. व चाहत्यांनी या व्हिडिओला भरभरून लाईक केलं आहे व कमेंटचा वर्षाव केला आहे.
या व्हिडिओत अनुष्काने आपल्या बायसेप्सची ताकद दाखवून दिली आहे. हा व्हिडीओ पाहून विरुष्काचे चाहते तर अवाक झालेच, पण विराटच्या तोंडूनही ‘ओ तेरी’ निघालं. अनुष्का विराटला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसते. व्हिडीओत ती एकदाच नाही, तर दोन वेळा विराटला उचलताना दिसते. व्हिडीओतून अनुष्काची ‘विराट’ ताकद पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अनुष्काच्या मसल पॉवरचं कौतुक इन्स्टाग्राम युजर्स करत आहेत.
व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट यांची छानशी केमिस्ट्री पाहायला मिळते. अनुष्का विराटला पहिल्यांदा उचलताना ‘तू मला मदत करत आहेस. स्वतःला उचलून घेण्यासाठी जोर लावू नकोस. प्रॉमिस कर’ असं दटावताना ऐकू येते. दुसऱ्यांदा ती विराटला आरामात उचलते. यशस्वी होताच ती आपले बळकट स्नायू दाखवत स्वतःलाच शाबासकीची थाप देतानाही दिसते.
काही दिवसांपूर्वी विराट कोहली व अनुष्का शर्माचा आपल्या मुलीसोबतचा विमानतळावरील फोटो वायरल झाला होता व त्या फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल होते. व ते एक उत्तम आईवडील आहेत असंही चाहत्यांकडून कौतुक करण्यात आलं होत.