आज एप्रिल फुल्ल डे सर्वांना फसवण्याचा दिवस याच दिवसाचा महत्व साधून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने भारतीय नागरिकांना दिली होती. याच मुद्धा पकडत नेटकऱ्यांनी पार इज्जतच काढली आहे.
२०१४ मध्ये देखील सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशाला अनेक वचनं आणि आश्वासनं दिली होती. मात्र त्यानंतर २ वेळा पंतप्रधान पद भूषवले असून सुद्धा परिस्थिती नेमकी विरुद्ध झाली आहे. त्यात ज्या मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आलं होत ते महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव, बेरोजगारी आणि इतर अनेक विषयांवर स्वतः नरेंद्र मोदी भाष्य देखील करत नाहीत. त्यामुळे आजचा दिवस भारतीय नेटिझन्स वेगळ्याप्रकारे साजरा करत आहेत.
देशभरात एकमेकांना फसवण्याचा दिवस म्हणून लोकप्रिय असणाऱ्या या दिवसानिमित्त भारतीय नेटकऱ्यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आज ट्विटरवर #GlobalFekuDay हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्यामुळे एकप्रकांरे नेटकऱ्यांनी मोदी यांनी दिलेल्या अश्वाचे वाभाडे काढले आहे.
On this #GlobalFekuDay let's keep the man and his mission to entertain non-stop alive. pic.twitter.com/hqOsvOe1zA
— Neha Chauhan (@nehajoychauhan) March 31, 2021
Let’s all start with basics on Global feku day since Assam elections r going ON “वैसे ही ये Climate change नहीं हुआ है, हम change हो गए है”
People of Assam think multiple times before voting for BJP
#GlobalFekuDay #AssemblyElections2021 pic.twitter.com/lMmkF2qVjK
— जूमला किंग (@fekubawa) March 31, 2021