कोल्हापूर । ९ फेब्रुवारी रोजी जवाहर नगर परिसरात लहान बालकांवर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला व त्यांच्या शरीराचे चावे घेतले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे निवेदन नगराध्यक्ष यांना युवासेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांनी, “भटक्या कुत्राचा जर बंदोबस्त केला नाही तर तीच कुत्री आरोग्य विभागात सोडू” असा सज्जड दम ही दिला आहे’.
यावेळी जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील यांनी नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांना धारेवर धरले. युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर मा.सौ. नगराध्यक्ष यांनी या विषयावर लवकरच कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी सभागृहात हा विषय लावून धरु असे अश्वासन दिले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, युवासेना तालुका अधिकारी अविनाश वासुदेव, उपतालुका अधिकारी अभिजित लोले, युवासेना इचलकरंजी विधानसभा समन्वयक पवन मेटे, युवासेना इचलकरंजी विधानसभा उपसमन्वयक रूषीकेश चव्हाण, युवासेना शहरअधिकारी सागर रघुनाथ जाधव, युवासेना शहर समन्वयक रतन वाझे, युवासेना उपशहर अधिकारी विकी बापुसो जाधव, शाहरुख मुजावर अमित शिरगुरे कबनुर सोशल मीडिया प्रमुख विनायक पोवार, कुमार माने सुनील मंत्याळ व युवासैनिक पदाधिकारी उपस्थित होते.