कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता केंद्र सरकारने रशियाच्या लसीला देशात वापरण्यासाठी परवानगी दिली आहे.
भारतातील कॉव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी प्रभावशाली असूनही पुरवठ्या अभावी अनेक राज्यात लसींचा तुटवडा झाला आहे. याचपार्श्वभूमीवर भारतीय आरोग्य केंद्राच्या झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार सोमवारी रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीला भारतात मान्यता दिली आहे.
हैद्राबाद मधील डॉ. रेड्डीज लॅबने ‘स्पुटनिक व्ही’ लस देशात आणण्यासाठी ‘रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’शी करार केला आहे. स्पुटनिक व्ही ही रशियन लस शरीरातील सर्दी व खोकला निर्माण करणाऱ्या व्हायरस ला मारून टाकते.ही रशियन लस इतर दोन लसी प्रमाणे दोन टप्प्यात असून नागरीकांना लवकरच घेता येणार आहे.