राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोविड लसीकरन संपूर्ण महाराष्ट्रात युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र आता अनेक लसीकरण केंद्र लसीआभावी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच केंद्राच्या बाहेर नो-स्टॉकचे बॅनर झळकताना दिसत आहे.
त्यातच काल तब्बल ४९ लसीकरण केंद्र लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात आली आहेत. त्यात पालिकेच्या ६ व राज्य आणि केंद्र सरकारच्या पाच केंद्रांचाही समावेश आहे. त्यामुळे एकूण लसीकरणाच्या वेगावर त्याचा परिणाम झाला असून दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण घटलं आहे. आज पर्यंत मुंबईत मंगळवारी ३९ हजार ५२२ नागरिकांना लस देण्यात आली. त्यापैकी १५ हजार ५१ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली.
तसेच मुंबईत सध्या १२९ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यात पालिकेची ३९, राज्य व केंद्र सरकारची १७, खासगी ७३ केंद्र आहेत. त्यात खासगी केंद्रावर दिवसभरात ७,४९३ नागरिकांचे लसीकरण होऊ शकली. लशीचा साठा पुरेसा नसल्यामुळे गेल्या २ दिवसांपासून काही खासगी केंदे्र बंद ठेवावी लागली होती. मात्र मंगळवारी पालिकेची व सरकारी केंद्रेही बंद ठेवावी लागली आहेत.