काही दिवसांपासून करोनाचे लसीकरण देशात सुरू झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी देशातील करोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत तर देशात दीड महिन्यातली सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल १७ हजार ४०७ नवे करोनाबाधित सापडले असून ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा १ कोटी ११ लाख ५६ हजार ९२३ इतका झाला असून आत्तापर्यंत करोनामुळे १ लाख ५७ हजार ४३५ रुग्ण दगावले आहेत.
त्यामुळे अन्य राज्यांपेक्षा यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबधित रुग्ण असल्याचे समोर आले असून सर्वसामान्य जनतेच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.