नांदेड :- गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होत. या चर्चांवर आज स्वत: अशोक चव्हाणांनी भाष्य केलं आहे.आज नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते यावर बोलत होते.
‘मी माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्यापासून किंबहुना माझ्या खानदानीपासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहे,काही लोक चर्चा करून मनोरंजन करीत असतात, त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. पण मी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहणार’,असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करत राज्यात सुरू असलेल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
अशोक चव्हाणांनी केलेल्या या विधानामुळे सभागृहात शिट्टा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केल्याने कार्यकर्तांसह पक्षाच्या बड्या नेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
हे ही वाचा:-
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ.रवी राणा यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन