उत्तर प्रदेश दि. १५ – उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंजमधून भाजपाचे खासदार कौशल किशोर यांच्या सुनेनं म्हणजेच अंकिता किशोरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. खासदार किशोर यांच्या घरासमोरच अंकिताने आपल्या हाताची नस कापली. पोलिसांनी तातडीने अंकिताला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखलं केलं. वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला असून तिच्या जिवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता या व्हिडिओत अंकिताने पती आयुषवर गंभीर आरोप केले होते. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.आपली फसवणूक झाल्याचेही अंकिताने या व्हिडीओमध्ये तिने सांगितलं होत.
रुग्णालयामध्ये अंकिताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी आयुषच्या घरासमोरच ब्लेडने माझी नस कापल्याची कबुली दिली आहे. मी नस कापली तेव्हा तिचा पती आयुष आणि अंकिताची सासू अंगणामध्ये फेऱ्या मारत होते. कोणीही मला आडवण्याचा प्रयत्न केला नाही. दीड तासानंतर पोलीस घटनास्थळी आले असा अरोप अंकिताने केला आहे.