मुंबई – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. मात्र मुंबई, पुणे यांसारख्या शहरात झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित करण्यात आला व परप्रांतीय मजुरांनी आपल्या कुटुंबसमवेत आपल्या घरची वाट धरली. कोरोनाच्या भीतीने आपला जीव मुठीत घेऊन ज्या मिळेल त्या वाहनांची आपल्या गावी गेले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता परत वाढताना दिसत आहे त्यामुळे राज्य सरकारकडून आता कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. व याच भीतीने अनेक प्रवाशांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली. शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन असला तरी याचा विचार न करता विना तिकीट गावी जाण्यासाठी गर्दी केली.
राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले तरी लोकल सेवा किंवा देशभरात होणारी रेल्वे वाहतूक याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत चालू आहे. त्यामुळे प्रवाशी मिळेल त्या गाडीने कोरोनाच्या भीतीने गावी जात आहेत. तसंच श्रमिक ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरल्यानेच ही गर्दी झाल्याची माहिती मिळत आहे.