भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अँकर संजना गणेशन यांनी १५ मार्च,२०२१ रोजी गोव्यामध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या विवाहाबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या, जसप्रीत बुमराहच नाव साऊथअभिनेत्री सोबतही जोडण्यात आलं होतं. सोशल मीडियावर अनेक अफवाई पसरत होत्या .
अखेर १५ मार्चला जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी गोव्यामध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह केला. विवाह झाल्यानंतर बुमराहने आणि संजनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली होती. नुकताच या नवविवाहित जोडप्याच्या विवाहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत होते.