कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोरोनाचा हाहाकार पसरला आहे. कधी बेड्स उपलब्ध न होणं, कधी इंजेक्शन तर कधी व्हेंटिलेटर न मिळाल्याने ऑक्सिजन अभावी रुग्ण दगवण्याची संख्या जास्त आहे.
याच पार्श्वभूमीवर उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पीएसए टेक्नॉलॉजीवर आधारित दोन नवे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी कंपन्यांना आदेश दिले आहे.
या प्रकल्पामध्ये हवेतील ऑक्सिजन शोषून सिलेंडरमध्ये भरणार असून चोवीस तासात१७५ ते २०० जम्बो सिलेंडर भरले जातील. परिस्थिती चिंताजनक आहे यातून बाहेर पडण्यासाठी मदतीची गरज आहे त्यामुळे या प्रकल्पाकरिता कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खाजगी रुग्णालयांनी पुढाकार घ्यावा व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकल्पात तयार होणारा ऑक्सिजन हा खासकरून कोविड रुग्णालयात पाठविले जातील असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.