नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला होता. यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी छत्रपती शिवाजी पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्य सरकारतर्फे बांधण्यात येणाऱ्या स्मारकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, आता भातखळकर यांच्या टीकेला आमदार रोहित पवारांनी प्रतिउत्तर दिले आहे,
युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडे फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील म्हणून पाहता? असा सवाल रोहित पवारांनी आमदार अतुल भातखळकर आणि भाजपाच्या सर्व नेत्यांना विचारला आहे. या संदर्भात रोहित पवारांनी ट्विट करून भातखळकर यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसात राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच”, असे ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य पाहून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे, याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.
कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी रुपयांचा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही,” असे ट्वीट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? ????भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच. https://t.co/lbtj30GEWr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 29, 2021